Posts

Image
आदर्श शिक्षक हेमंत सारदल यांची चेअरमन पदावर बिनविरोध निवड महाड (स्मरणिका साळुंखे) :- महाड तालुक्यातील अप्पर तुडील शाळेचे मुख्याध्यापक हेमंत सारदल यांची महाड तालुका शिक्षक पतपेढीच्या चेअरमन पदावर बिनविरोध निवड झाली. याबद्दल माजी चेअरमन संजय कोंडविलकर, तालुका अध्यक्ष सचिन खोपडे, वसंत दासगावकर, नवनाथ पवार, विजय जाधव देठे, शिक्षक नेते भिकाजीराव मांढरे, संजेश साळुंखे, समीर होडबे, वसंत साळुंखे यांनी भेटून अभिनंदन केले. सर्व शिक्षकांना सोबत घेऊन पतपेढीचा आलेख उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवीन असे उदगार हेमंत सारदल सर यांनी काढले.
Image
77 व्या निरंकारी समागमाच्या सेवांचा विधिवत शुभारंभ सेवेमध्ये कोणताही भेदभाव न बाळगता ती निष्काम भावनेने करावी - सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज महाड (स्मरणिका साळुंखे) :- या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. त्यांची भाषा, वेशभूषा, आहार, जात, धर्म, संस्कृती वेगवेगळे आहे. या सगळ्या विभिन्नता असूनही आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे आपण सर्व मनुष्य आहोत. आपला वर्ण कोणताही असो, वेशभूषा कशीही असो, देश कोणताही असो किंवा खाणे-पिणे कसेही असो; सर्वांच्या धमण्यांमध्ये एकसारखेच रक्त वाहत आहे आणि सगळे एकसारखाच श्वास घेत आहेत. आपण सर्व परमात्म्याची लेकरं आहोत. हीच भावना अनेक संतांनी वेगवेगळ्या समयी आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या भाषेतून आपापल्या शैलीमध्ये ‘समस्त संसार, एक परिवार’ या संदेशाच्या रूपात व्यक्त केली.  मागील सुमारे 95 वर्षांपासून संत निरंकारी मिशन हाच संदेश केवळ प्रेषित करत आहे इतकेच नव्हे, तर अनेक सत्संग आणि समागमांचे नियमितपणे आयोजन करुन या संदेशाचे जीवंत उदाहरण प्रस्तुत करत आहे. मिशनचे लक्षावधी भक्त यावर्षीही 16, 17 आणि 18 नोव्हेंबर, 2024 रोजी संत निरंकारी आध्यात...
Image
खाडीपट्टयामध्ये इंटरनॅशनल स्कूलची मुहूर्तमेढ रोवली  पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्थेने चिंभावेत केले भूमिपूजन महाड (स्मरणिका साळुंखे) :- महाड तालुक्यातील चिंभावे बौद्धवाडी येथे सीबीएसई बोर्डचे नर्सरी ते बारावी आर्ट्स, कॉमर्स व सायन्स आणि आयटी विभाग वस्तीगृह इमारतीचा तसेच नियोजित शाळेचा शुभारंभ भूमिपूजन व शाळेच्या नियोजित इमारतीच्या फलकाचे अनावरण माजी आमदार तथा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट अध्यक्ष डॉ. जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य सुधाकर खैरे सरांनी उचललेले हे पाऊल यशस्वी होणारच असे उपस्थितांसमोर प्रतिपादन केले. चिंभावे येथील सुपुत्र पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्था कल्याण मुंबई या संस्थेचे अध्यक्ष तसेच माजी प्राचार्य सुधाकर खैरे सर यांनी रविवारी चिंभावे बौद्धवाडी येथे स्वतःच्या मालकीची अडीच एकर जमीन नियोजित शाळेकरिता देणगी देऊन सदर वस्तीगृह इमारतीचा नियोजित शाळेचा शुभारंभ व शाळेच्या नियोजित इमारतीच्या फलकाचे अनावरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उ...
Image
पोयनाड येथील तलावावर जेएसडब्ल्यु कंपनीच्या निकामी स्लॅगचा भराव, ग्रामस्थांचा विरोध पेझारी/रायगड (मुजाहिद मोमीन) :- ग्रुप ग्रामपंचायत पोयनाड आणि आंबेपुर हद्दीतील तलावावर जेएसडब्ल्यु कंपनीच्या निकामी केमिकल स्लॅगचा भराव करण्यात येत आहे. या प्रकाराला ग्रामस्थांच्या वतीने निलेश चवरकर यांनी विरोध केला आहे.  येथील तलावावर भराव करताना जेएसडब्ल्यु कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता, कंपनीचा निकामी झालेल्या विषारी व धोकादायक स्लॅगचा भराव करण्यात आलेला आहे. या विषारी स्लॅगच्या भरावामुळे तलावातील मासे मृत होण्याचा धोका तसेच तिथे येणारी लोकं जे त्यात कपडे धुतात व तेथील ग्रामस्थांची मुले त्यात (पोहतात) अंघोळ करतात त्यांना रोगराईचा सामना करावा लागू शकतो. त्याची जवादारी कोण घेईल? संबंधित शासकीय अधिकारी घेतील की कॉन्ट्रॅक्टर घेतील? की ठेकेदार घेतील? असा प्रश्न निलेश चवरकर यांनी उपस्थित केला आहे. तलवाचे पाणी इतर कामासाठीही वापरले जाते आणि या विषारी स्लॅगच्या भरावने नवीन झाडं झुडपे होतील का किंवा जगतील का? अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या असून फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी ठेकेदारांनी ग्रामस्थ...
Image
डॉ. अश्विनी जोशी यांचे वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या MRCP (UK) परिक्षेत उज्ज्वल यश रोहा (प्रतिनिधी) :- रोह्याच्या वरद क्लिनिकच्या डॉ. अश्विनी जोशी यांनी "मेंबर ऑफ रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन, यूनाइटेड किंगडम" या प्रतिष्ठेच्या परिक्षेत विशेष प्राविण्यासह उज्ज्वल यश प्राप्त केले. तीन टप्प्यांत असलेल्या या खडतर परिक्षेत त्यांनी विशेष छाप पाडली. यामुळे मधुमेह रुग्णांना सेवा देताना अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या डॉ. अश्विनी जोशी यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वैद्यकीय सेवा देताना डॉ. जोशी यांना २०१५ साली डॉ. आनंदीबाई जोशी सन्मान पुरस्कार मिळाला आहे, या सोबतच कोरोना महामारी काळात त्यांना वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल "World Book of London" यांनी देखील सन्मानित केले. डॉ. जोशी यांनी बी जे मेडिकल कॉलेज मधुन MBBS झाल्यानंतर इंटरनल मेडिसिन मध्ये DNB पदव्यूत्तर शिक्षण पुर्ण केले. रोह्यातील वरद क्लिनिक बरोबरच डॉ. जोशी यांचे पुण्यातील वनाझ येथे स्वतःचे क्लिनीक आहे. तसेच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे देखील त्या सेवा देतात. मुंबई पुणे येथे जाऊन महागडे उपच...
Image
निसर्ग ढाबा येथे हुक्का पार्लरवर अँटी नार्कोटिक्स सेल ची कारवाई या प्रकारांना साथ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर पनवेल (प्रतिनिधी) :- कोनगांव, पनवेल येथील निसर्ग ढाबा येथे हुक्का पार्लरवर १७/०४/२०२४ रोजी ०२:४१ ते ०५ १० वा. सुमारास अँटी नार्कोटिक्स सेलने कारवाई करून हुक्का पार्लरचे मालक, मॅनेजर, वेटर यांच्याविरूद्ध सिगारेट व तंबाखू उत्पादने अधिनियम २०१८ चे कलम ४ (क), २१ (क), सह म.पो.का. कलम ३३ (डब्ल्यू) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली, परंतु या हद्दीत डान्सबार सह असे प्रकार सुरू असताना देखील या बेकायदेशीर प्रकारांना साथ देणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. नवी मुंबईत यापूर्वी कोपरखैरणे येथे रात्री दिड नंतर डान्सबार सुरू असल्याचे आढळून आल्याने कोपरखैरणे येथील पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांच्यावर डी.सी.पी. पानसरे यांनी कारवाई करून त्यांना तीन महिने निलंबीत ठेवले होते. त्यानंतर त्याला वर्षभर नियंत्रण कक्ष येथे ठेवले होते.  परंतु पनवेल हद्दीत ...
Image
कर्जत प्रेस असोसिएशनची स्थापना; कार्यकारिणी जाहीर   अध्यक्ष पदावर भूषण प्रधान कर्जत : सतिश पाटील कर्जत तालुक्यातील सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी कर्जत प्रेस असोसिएशन ही संघटना नोंदणीकृत करण्यात आली आहे. या संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संस्थेच्या पहिल्याच बैठकीत समाजातील पीडितांच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जत प्रेस असोसिएशन मध्ये माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या कर्जत तालुक्यातील 27 पत्रकारांचा समावेश आहे.  रायगड धर्मादाय अधिकारी कार्यालयात कर्जत प्रेस असोसिएशन ही पत्रकारांची संघटना नोंदणी झाली आहे.कर्जत तालुक्यातील कोणत्याही माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी कर्जत प्रेस असोसिएशन संघटना स्थापन करण्यात आली असून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोंदणीकृत संस्थेचे पदाधिकारी यांची घोषणा करण्यासाठी आपल्या सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. कर्जत येथील सिबिसी हॉटेलचे एसी सभागृहात कर्जत प्रेस असोसिएशनची पहिली संवाद बैठक झाली. त्यावेळी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, यु ट्यूब, वेब पोर्टल आणि डिजिटल मीडिया मध्ये काम करणा...