माणगांव नगरपंचायत मधील राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक व राष्ट्रवादीचा एक बडा नेता शिवसेनेच्या गळाला?
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट?
माणगांव : प्रमोद जाधव
महाराष्ट्र राज्यात अनेक राजकीय समीकरणे बदलत असली तरी रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वारंवार हादरे बसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी खासदार तटकरे यांच्या परिवाराशी कायमस्वरूपी सलोखा व ऐक्य असलेल्या एका बड्या नेत्याच्या पुत्राने राजकारणात उडी घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आपले समर्थक यांच्यासह प्रवेश केला. त्यानंतर लोणेरे गोरेगाव विभागात देखील बहुसंख्य सरपंच आणि ग्रामस्थांनी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला. यामूळे भावी येऊ घातलेल्या सर्व निवडणुकांपूर्वी माणगांव तालुक्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे.
आणि त्यामध्ये आता माणगांव नगरपंचायत मधील राष्ट्रवादी च्या २ नगरसेवक/नगरसेविका? व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता हा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश होऊन माणगांव तालुक्यात मोठा राजकीय भूकंप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हे नगरसेवक/नगरसेविका गिफ्ट देणार असल्याची चर्चा माणगांव तालुक्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
७ फेब्रुवारी रोजी माणगांव नगरपंचायत ची विषय समिती निवडणूक बिनविरोध पार पडली. सर्वपक्षीय एकत्र आले अशी घोषणा झाली होती. मात्र खरच मनोमिलन झाले का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे? त्यामध्ये एखाद्याला सभापती "पद" आणि दुसऱ्याचे उघडे "कद" यामूळे नाराजी निर्माण झाली आहे का?असा प्रश्न देखील माणगांवकराना पडला आहे. असे जर होणार असेल तर खास सुनिल तटकरे यांच्या माणगांव मधील विश्वासाहार्य साम्राज्याला सुरुंग लागणार का? अशी चर्चा देखील सुरू आहे. या होणाऱ्या पक्षप्रवेशाबाबत माणगाव नगरपंचायत हद्दीतील अनेक सत्ताधारी नेते आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी स्तुती सुमने उधळण करत जनतेमध्ये हशा पिकवला आहे.
Comments
Post a Comment