कर्जत प्रेस असोसिएशनची स्थापना; कार्यकारिणी जाहीर
कर्जत : सतिश पाटील
कर्जत तालुक्यातील सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी कर्जत प्रेस असोसिएशन ही संघटना नोंदणीकृत करण्यात आली आहे. या संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संस्थेच्या पहिल्याच बैठकीत समाजातील पीडितांच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जत प्रेस असोसिएशन मध्ये माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या कर्जत तालुक्यातील 27 पत्रकारांचा समावेश आहे.
रायगड धर्मादाय अधिकारी कार्यालयात कर्जत प्रेस असोसिएशन ही पत्रकारांची संघटना नोंदणी झाली आहे.कर्जत तालुक्यातील कोणत्याही माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी कर्जत प्रेस असोसिएशन संघटना स्थापन करण्यात आली असून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोंदणीकृत संस्थेचे पदाधिकारी यांची घोषणा करण्यासाठी आपल्या सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. कर्जत येथील सिबिसी हॉटेलचे एसी सभागृहात कर्जत प्रेस असोसिएशनची पहिली संवाद बैठक झाली. त्यावेळी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, यु ट्यूब, वेब पोर्टल आणि डिजिटल मीडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी बैठकीला उपस्थिती लावली. कर्जत प्रेस असोसिएशनचे नूतन कार्यकारिणीची घोषणा धर्मादाय अधिकारी कार्यालयात नोंद असलेल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष पेरणे यांनी केली आणि नवीन कार्यकारिणीचे लेखणी भेट देवून स्वागत केले. या बैठकीत अध्यक्ष भूषण प्रधान, कार्याध्यक्ष अभिषेक कांबळे, उपाध्यक्ष नरेश कोळंबे, संदेश साळुंके, सचिव कैलास म्हामले, खजिनदार रोशन दगडे आणि सल्लागार किशोर गायकवाड यांना नूतन कार्यकारिणी बद्दल स्वागत करण्यात आले.<br>कर्जत प्रेस असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीला नरेश जाधव,किशोर गायकवाड,दीपक बोराडे,दिगंबर चंदने, जगदीश दगडे, गणेश लोट, संकेत घेवारे, अभिजित दरेकर, अरुण बैकर यांनी काही सूचना करीत शुभेच्छा दिल्या. तर या कार्यकारिणीत सदस्य म्हणून नितीन पारधी,सतिश पाटील, रामदास माळी, वसंत कदम, विजय डेरवणकर, सचिन भालेराव, कृष्णा सगणे यांच्यासह तालुक्यातील अन्य सात पत्रकार यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी सुरुवातीला कर्जत प्रेस असोसिएशनचे घटना संघटनेचे सचिव कैलास म्हामले यांनी वाचून दाखवली. संघटनेचे अध्यक्ष भूषण प्रधान यांनी आपली संघटना वृत्तपत्र तसेच यू ट्यूब,चॅनल यांच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करीलच पण सोशल मीडियावर संघटनेचे काम सुरू केले जाणार असून समाजातील कोणत्याही थरातील लोकांना त्या मध्ये संधी देवून समाजातील सर्व स्तरावरील प्रश्न अडचणी समजून घेवून त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचा निर्णय आणि ठराव घेण्यात आला. तर सामाजिक कार्य करण्यासाठी ही संघटना पुढाकार घेणार असल्याने या विभागाचे प्रमुख म्हणून दीपक बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली.तर संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. कैलास मोरे आणि ॲड. श्रीकृष्ण डुकरे यांनी जबाबदारी स्वीकारली असून त्यांचे देखील अभिनंदन करण्यात आले.<br>संस्थेचे प्रमुख विश्वस्त संतोष पेरणे यांनी कर्जत प्रेस असोसिएशनचां स्थापना सोहळा कर्जत शहरात आयोजित केला जाणार आहे. त्या कार्यक्रमात संस्थेच्या सर्व सदस्यांना ओळख पत्र आणि पत्रकारांचा विमा उतरवून त्याचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची घोषणा केली. तर चार पत्रकार पुरस्कार देखील कर्जत प्रेस असोसिएशन कडून देण्यात येतील अशी माहिती दिली.कर्जत प्रेस असोसिएशन शिवाय अन्य एका तालुक्यातील प्रेस असोसिएशन कडून रायगड धर्मादाय अधिकारी कार्यालयात नोंदणी असलेल्या संस्थेचे संलग्नता मागितली आहे,त्या सर्वांना धर्मादाय अधिकारी यांचे कार्यालयाने दिलेले प्रमाणपत्र सह संलग्नता प्रमाणपत्र दिले जाईल असे देखील संतोष पेरणे यांनी जाहीर केले.तर कर्जत प्रेस असोसिएशन मध्ये कोणताही पत्रकार सहभागी होऊ शकतो, पत्रकारांचे संरक्षण आणि हिताचे प्रश्न मांडण्यासाठी ही संघटना तयार करण्यात आली असल्याने तालुक्यातील सर्व पत्रकाराचे संघटनेत स्वागत असेल असा निर्णय संस्थेच्या घटनेत असल्याची माहिती देण्यात आली.तसेच येत्या आठ दिवसात कर्जत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि राजकीय पक्षाचे प्रमुख यांना भेटून धर्मादाय संस्थेत नोंदणी असलेल्या कर्जत प्रेस असोसिएशन यांची नवीन कार्यकारिणी आणि सभासद यांची नावे असलेली यादी देण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. कार्यकारिणीचा विस्तार लवकरात लवकर करून रिक्त पदे जाहीर केली जाणार आहेत.
Comments
Post a Comment