डॉ. अश्विनी जोशी यांचे वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या MRCP (UK) परिक्षेत उज्ज्वल यश
रोहा (प्रतिनिधी) :- रोह्याच्या वरद क्लिनिकच्या डॉ. अश्विनी जोशी यांनी "मेंबर ऑफ रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन, यूनाइटेड किंगडम" या प्रतिष्ठेच्या परिक्षेत विशेष प्राविण्यासह उज्ज्वल यश प्राप्त केले. तीन टप्प्यांत असलेल्या या खडतर परिक्षेत त्यांनी विशेष छाप पाडली. यामुळे मधुमेह रुग्णांना सेवा देताना अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या डॉ. अश्विनी जोशी यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वैद्यकीय सेवा देताना डॉ. जोशी यांना २०१५ साली डॉ. आनंदीबाई जोशी सन्मान पुरस्कार मिळाला आहे, या सोबतच कोरोना महामारी काळात त्यांना वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल "World Book of London" यांनी देखील सन्मानित केले.
डॉ. जोशी यांनी बी जे मेडिकल कॉलेज मधुन MBBS झाल्यानंतर इंटरनल मेडिसिन मध्ये DNB पदव्यूत्तर शिक्षण पुर्ण केले. रोह्यातील वरद क्लिनिक बरोबरच डॉ. जोशी यांचे पुण्यातील वनाझ येथे स्वतःचे क्लिनीक आहे. तसेच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे देखील त्या सेवा देतात. मुंबई पुणे येथे जाऊन महागडे उपचार घेणाऱ्या रोहा पंचक्रोशीतील मधुमेही रुग्णांना डॉ. जोशी यांच्यामुळे खुप मोठा दिलासा मिळाला आहे.
Comments
Post a Comment