निसर्ग ढाबा येथे हुक्का पार्लरवर अँटी नार्कोटिक्स सेल ची कारवाई

या प्रकारांना साथ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) :- कोनगांव, पनवेल येथील निसर्ग ढाबा येथे हुक्का पार्लरवर १७/०४/२०२४ रोजी ०२:४१ ते ०५ १० वा. सुमारास अँटी नार्कोटिक्स सेलने कारवाई करून हुक्का पार्लरचे मालक, मॅनेजर, वेटर यांच्याविरूद्ध सिगारेट व तंबाखू उत्पादने अधिनियम २०१८ चे कलम ४ (क), २१ (क), सह म.पो.का. कलम ३३ (डब्ल्यू) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली, परंतु या हद्दीत डान्सबार सह असे प्रकार सुरू असताना देखील या बेकायदेशीर प्रकारांना साथ देणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

नवी मुंबईत यापूर्वी कोपरखैरणे येथे रात्री दिड नंतर डान्सबार सुरू असल्याचे आढळून आल्याने कोपरखैरणे येथील पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांच्यावर डी.सी.पी. पानसरे यांनी कारवाई करून त्यांना तीन महिने निलंबीत ठेवले होते. त्यानंतर त्याला वर्षभर नियंत्रण कक्ष येथे ठेवले होते.  परंतु पनवेल हद्दीत इतके भयानक प्रकार सुरू असताना देखील पनवेलच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही? यावेळी झोन - २ चे डी.सी.पी. पानसरे आता गप्प का? पनवेल हद्दीत वेगळा कायदा आणि कोपरखैरणे हद्दीत वेगळा कायदा आहे का? वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मर्जीतील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न करण्याचा नवीन नियम तयार झालाय का? असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

पनवेल आणि नवी मुंबईतील डान्स बारमध्ये रात्री उशीरापर्यंत चालणारे अश्लील प्रकार कायम ठेवण्यासाठी येथील पोलीसांना प्रचंड प्रमाणात हफ्ता पोहोचत असल्यामुळे या समाजविघातक प्रकारांविरूद्ध कारवाई करण्यास पोलीसांकडून नेहमीच टाळाटाळ केली जात आहे. पनवेल येथील जगदंबा बार, चाणक्य बार, कपल बार, क्रेझी बॉईज बार, ग्रिट्स बार, गोल्डन नाईट, टाईम्स, गोपिका, कपल, गोल्डन डिगर, कोनगाव येथील टायटन, नाईट रायडर बार, चांदनी बार, मूननाईट बार, स्वामी बार, माया बार, बिनधास्त बार, आयकॉन बार, तानसा, बाँबे बार, कळंबोली येथील तानसा बार, कॅप्टन बार, तारा, प्रियंका, तळोजा येथील चंद्रविलास बार, महाराष्ट्र बार, तसेच कमल पंजाब अँड महाराष्ट्र बार, निसर्ग बार, कोन येथील नटराज बार (व्ही.आय.पी. रूममध्ये अश्लील प्रकार), साई दर्शन बार (पहिल्या मजल्यावर अश्लील प्रकार), वेल्वेट बार (रात्री उशीरापर्यंत अश्लील प्रकार), कोपरखैरणे येथील बेला बार, सावली बार, रबाळे एम.आय.डी.सी. येथील संगम बार, मूड बार, सेल्फी बार, मायरा बार, विटावा बार, सूरसंगीत बार, वाशी येथील कपील बार, MH 43 बार किंग्ज बार, रमेश बार यांसारख्या अनेक ऑर्केस्ट्रा बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली रात्री उशीरापर्यंत धिंगाणा सुरू असतो पनवेल सुकापूर येथील राज क्लब, कपल क्लब आणि विनम्र क्लब या क्लब मध्ये मोठे जुगार चालतात पण पनवेल वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यास वरिष्ठ IPS पोलीस अधिकारी का घाबरतात? असा प्रश्न अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

Comments

Popular posts from this blog