पोयनाड येथील तलावावर जेएसडब्ल्यु कंपनीच्या निकामी स्लॅगचा भराव, ग्रामस्थांचा विरोध

पेझारी/रायगड (मुजाहिद मोमीन) :- ग्रुप ग्रामपंचायत पोयनाड आणि आंबेपुर हद्दीतील तलावावर जेएसडब्ल्यु कंपनीच्या निकामी केमिकल स्लॅगचा भराव करण्यात येत आहे. या प्रकाराला ग्रामस्थांच्या वतीने निलेश चवरकर यांनी विरोध केला आहे. 

येथील तलावावर भराव करताना जेएसडब्ल्यु कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता, कंपनीचा निकामी झालेल्या विषारी व धोकादायक स्लॅगचा भराव करण्यात आलेला आहे. या विषारी स्लॅगच्या भरावामुळे तलावातील मासे मृत होण्याचा धोका तसेच तिथे येणारी लोकं जे त्यात कपडे धुतात व तेथील ग्रामस्थांची मुले त्यात (पोहतात) अंघोळ करतात त्यांना रोगराईचा सामना करावा लागू शकतो. त्याची जवादारी कोण घेईल? संबंधित शासकीय अधिकारी घेतील की कॉन्ट्रॅक्टर घेतील? की ठेकेदार घेतील? असा प्रश्न निलेश चवरकर यांनी उपस्थित केला आहे. तलवाचे पाणी इतर कामासाठीही वापरले जाते आणि या विषारी स्लॅगच्या भरावने नवीन झाडं झुडपे होतील का किंवा जगतील का? अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या असून फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी ठेकेदारांनी ग्रामस्थांना  व ग्रामपंचायतीला न विचारताच हे काम चालू केले आहे. अनेक वर्षांपासून हा तलाव पोयनाडचा तलाव या नावाने ओळखला जातो.

ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत तलावातून पाण्याचा उपसा केला गेला तसेच तलावामध्ये काच बाटल्या, इतर कचरा व घाण न काढता तलावामध्ये विषारी भराव चालू आहे. इथे कोणतेही अधिकारी फिरकायला व पाहणी करण्यासाठी आलेले नाहीत. पोयनाड ग्रामस्थांना कोणतीही सूचना तलावाच्या संदर्भात न देता व या तलावामध्ये चांगले, अथवा वाईट काम करायचे आहे तरी इथे फलक लाऊन ग्रामस्थांना सूचित करायला पाहिजे होते. येथे जे काही काम सुरू आहे त्याबाबत ठेकेदर व कॉन्ट्रॅक्टर यांनी ग्रामस्थांना योग्य ती माहिती देऊन काम चालू करायला पाहिजे होते. पण तसे न करता कॉन्ट्रॅक्टर व ठेकेदार यांनी बिनधास्तपणे काम चालू केले आहे ग्रामस्थांना विश्वासात न घेता ही विकासकामे होतात का? हा तलाव ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांचा आहे, की त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांचा आहे? असा प्रश्न उपस्थित झालेला असून ग्रामस्थांना विश्वासात न घेता सुरू करण्यात आलेले हे काम थांबविण्यात यावे व कोणतेही काम असेल तर ते ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच करावे अशी मागणी निलेश चवरकर यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog