आदर्श शिक्षक हेमंत सारदल यांची चेअरमन पदावर बिनविरोध निवड
महाड (स्मरणिका साळुंखे) :- महाड तालुक्यातील अप्पर तुडील शाळेचे मुख्याध्यापक हेमंत सारदल यांची महाड तालुका शिक्षक पतपेढीच्या चेअरमन पदावर बिनविरोध निवड झाली.
याबद्दल माजी चेअरमन संजय कोंडविलकर, तालुका अध्यक्ष सचिन खोपडे, वसंत दासगावकर, नवनाथ पवार, विजय जाधव देठे, शिक्षक नेते भिकाजीराव मांढरे, संजेश साळुंखे, समीर होडबे, वसंत साळुंखे यांनी भेटून अभिनंदन केले.
सर्व शिक्षकांना सोबत घेऊन पतपेढीचा आलेख उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवीन असे उदगार हेमंत सारदल सर यांनी काढले.
Comments
Post a Comment